मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जि. प., पं. स.  स्वतंत्र निवडणूक लढविणार

गुहागर तालुका कार्यकारणी बैठकीमध्ये निर्णय

गुहागर : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची बैठक नुकतीच झाली. या बैठकीमध्ये आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समिती जागा महाविकास आघाडीतून मिळाल्या नाही, तर तालुक्यात स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष पद्माकर आरेकर यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी तालुक्यात घराघरात पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला तालुक्यातील कार्यकारणी सदस्य संख्येने उपस्थित होते.

बैठकीत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडीतून शरद पवार गटाला किती सीट सोडणार यावर कार्यकर्त्यांकडून विचारणा करण्यात आली. यावर २ जिल्हा परिषद व ४ पंचायत समितीच्या जागा मागण्यासंदर्भात सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे एकमत झाले. नाहीतर शरद पवार गट गुहागरमध्ये स्वतंत्र लढेल, असे ठरवण्यात आले.

गुहागर तालुक्यात शरद पवार गटाचे मतदार मोठ्या प्रमाणावर असून ते टीकवून ठेवण्यासाठी तुतारीचे सीट उभे करणे गरजेचे असल्याचे मत कार्यकर्त्यांनी मांडले. पाचही जिल्हा परिषद गटामध्ये जाऊन इतर अनुपस्थित कार्यकर्त्यांची भेट घेऊन पक्षवाढी संदर्भात नियोजन करण्यात आले. येणाऱ्या काळात प्रदेशाध्यक्ष व सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन तालुक्यातील परिस्थिती व विकास कामांबद्दल चर्चा केली जाणार आहे.

यावेळी कार्याध्यक्ष आसिम साल्हे, उपाध्यक्ष अनिल शिंदे, ओबीसी सेल अध्यक्ष अजित बेलवलकर, शशिकांत पवार, जिल्हा परिषद आबलोली गट अध्यक्ष, अल्पसंख्यांकचे दाऊद साल्हे, कुलदीप पवार व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!