मुख्य बातमी

मराठा मंदिर स. रा. देसाई अध्यापक विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात

रत्नागिरी : येथील मराठा मंदिर स. रा. देसाई अध्यापक विद्यालयात माजी राष्ट्रपती स्व. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती तसेच कवी नारायण गंगाराम सुर्वे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी स. रा. देसाई अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रांत रावराणे यांच्या हस्ते डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सचिन पाटील, प्रा. सुनील जोपळे, प्रा. डॉ. आवटे आणि छात्र यांची उपस्थिती लाभली.

त्यानंतर या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. रावराणे यांनी माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनातील प्रसंग आपल्या मनोगतातून कथन केले तसेच कवी नारायण सुर्वे यांच्या कार्याविषयी माहिती कथन केली.

या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी.एड. द्वितीय वर्षातील सर्व छात्र अध्यापकांनी उत्तमरित्या केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!