मुख्य बातमीराजकारण

रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक 

रत्नागिरी : पुढील कालावधीत होऊ घातलेल्या रत्नागिरी नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. काँग्रेस पक्षाकडून उद्या (१४ ऑक्टोबर) ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता काँग्रेस भवन येथे काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी आणि शहर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आगामी नगर पालिका निवडणुकीच्या दृष्टीने रणनितीवर चर्चा करण्यात येणार आहे.

रत्नागिरी नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर पालिका प्रभाग रचना सोडत नुकतीच जाहीर करण्यात आली. पुढील काही कालावधीत नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आपली तयारी सुरू केली आहे. शहरातील प्रभाग निहाय आढावा घेतानाच काँग्रेस पक्षाकडून नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीची तयारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी उद्या (१४ ऑक्टोबर) महत्त्वपूर्ण बैठक घेतली जाणार आहे.

काँग्रेस भवन येथे प्रदेश सरचिटणीस रमेश कीर, जिल्हाध्यक्ष नुरुद्दिन सय्यद यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि शहरातील कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडेल, अशी माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष अशपाक काद्री यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!