मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हाराजकारण
आमदार भास्कर जाधव यांची आज खोडदे येथे ग्रामस्थांच्या भेटीसाठी उपस्थिती

आबलोली (संदेश कदम) : जिल्हा परिषद पडवे गटातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या सर्व पदाधिकारी, शाखाप्रमुख, महिला आघाडी, युवा सेना यांच्याबरोबर ग्रामस्थांच्या – नागरिकांच्या भेटीसाठी आज (२९ ऑगस्ट) गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे गुहागर तालुक्यातील खोडदे आठवडा बाजार येथील श्री नवलाई देवीच्या सहाण सभागृह येथे दुपारी २.३० या वेळेत विकास कामाबाबत समोरासमोर चर्चा करणार आहेत.
यावेळी पडवे जिल्हा परिषद गटातील सर्व गावातील ग्रामस्थांनी विकास कामासंदर्भात चर्चा करण्यासाठी वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन बाईत, तालुका सचिव विलास गुरव, उपतालुका प्रमुख काशिनाथ मोहिते, विभाग प्रमुख रवींद्र आंबेकर, शरद साळवी यांनी केले आहे.



