मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

आयटीआय संगमेश्वर येथे रिक्त जागा प्रवेशासाठी २० सप्टेंबरपर्यंत मुदत

संगमेश्वर : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वीजतंत्री, जोडारी, यांत्रिक डिझेल, ड्रेसमेकिंग, नळकारागीर व सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) या व्यवसायातील रिक्त जागांसाठी विहीत मुदतीत अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरण्यासाठी व अर्ज निश्चिती करण्यासाठी अंतिम मुदत २० सप्टेंबर २०२५ आहे. https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरणे व इतर माहिती उपलब्ध आहे. याअगोदर अर्ज भरलेले मात्र प्रवेश न मिळालेले प्रशिक्षणार्थी सुद्धा या प्रवेशासाठी पात्र आहेत. लाभार्थ्यांनी त्यांचे प्रवेश अर्ज भरणे, अर्ज निश्चितीकरण करणे या बाबी विहित वेळेत पूर्ण कराव्या.

अधिक माहितीसाठी ०२३५४-२९९३४२ आणि (मो.क्र. ७०२०८५५९३७, ९५८८४६७६६१, ९७६४४५८५९८, ९४२१२२९३७१) या क्रमांकांवर संपर्क करावा, असे आवाहन संगमेश्वर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य र. वि. कोकरे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!