मुख्य बातमीशैक्षणिक

दहावी व बारावी खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव पाठविण्यासाठी मुदतवाढ

रत्नागिरी : फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेसाठी क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव पाठविण्यासाठी २१ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडून आपले सरकार प्रणालीद्वारे क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने १५ एप्रिलपर्यंत स्वीकारण्याबाबत सर्व विभागीय मंडळांना कळविण्यात आले होते. तथापि १० एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत आपले सरकार सेवा पोर्टल नियमित देखभालीसाठी बंद राहणार असल्याने सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने संबंधित विभागीय मंडळाकडे सादर करण्यासाठी २१ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी, उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालये मुख्याध्यापक/प्राचार्य व सर्व संबंधित घटकांनी या बाबीची नोंद घ्यावी, असे विभागीय सचिव, कोकण विभागीय मंडळ सुभाष चौगुले यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!