मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

वणंद येथे वाहून गेलेल्या इसमाचा मृतदेह सापडला

दापोली : तालुक्यातील वणंद येथे सोमवारी सकाळी पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या राजेंद्र सोनू कोळंबे (४५) यांचा मृतदेह आज (२७ मे) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सापडला. वणंद येथील कोंडीच्या पुलावरून कामावर जात असताना राजेंद्र कोळंबे हे नदीच्या प्रवाहात वाहून गेले होते.

या पुलापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला. राजेंद्र कोळंबे यांच्या शोधकार्यासाठी दापोली पोलीस प्रशासन, महसूल विभाग, स्थानिक ग्रामस्थ आणि युवक यांनी कालपासून कसून शोधमोहीम राबवली होती. अखेर, आज सायंकाळी त्यांचा मृतदेह सापडल्याने परिसरातील हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!