मुख्य बातमी

जयगड येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा

रत्नागिरी : तालुक्यातील महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या ३५२ व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने आज (६ जून) ग्रामपंचायत जयगडमध्ये शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.

महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, ज्येष्ठ शिवसैनिक कमलाकर महादेव बोरकर यांच्या हस्ते स्वराज्य गुढी उभारण्यात आली. तर ज्येष्ठ शिवसैनिक तथा माजी सरपंच अनिरुद्ध कमलाकर साळवी व कमलाकर बोरकर यांच्या हस्ते श्रीशिवमुद्रेच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग, श्री. बावीस्कर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!