मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

चिंद्रवळे (गुहागर) येथे १६, १७ मे रोजी संयुक्त जयंती उत्सव; सारनाथ बुद्ध विहाराचा जिर्णोध्दार व रौप्य महोत्सव सोहळा

आबलोली (संदेश कदम) : सहकारी संघ (ता. गुहागर शाखा क्र.५५) चिंद्रवळे व रमाई महिला मंडळ आणि चिंद्रवळे बौद्धजन प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचा जयंती महोत्सव आणि सारनाथ बुद्ध विहाराचा जीर्णोद्धार व रौप्य महोत्सव सोहळा १६ व १७ मे रोजी मौजे चिंद्रवळे (ता. गुहागर) येथे आयोजित करण्यात आला आहे.

१६ मे रोजी सकाळी ९ वाजता बुद्धमूर्ती मिरवणूक, प्रतिष्ठापना, ध्वजारोहण, मनोगत, देणगीदार, मान्यवर यांचा सत्कार व आभार कार्यक्रम, दुपारी १.३० वा. स्नेहभोजन, रात्री ९ वाजता मुलांचे विविध गुणदर्शक कार्यक्रम होतील. १७ मे रोजी सकाळी ९ वाजता बुद्धपूजा पाठ, सकाळी १०.३० वाजता उत्तीर्ण विद्यार्थी गुणगौरव सोहळा व मनोगत, सकाळी ११.३० वाजता गावातील महिलांचा मेळावा दुपारी १.३० वा. स्नेहभोजन, ३ वाजता मुलांच्या व महिलांच्या विविध स्पर्धा तसेच रात्री ८ वाजता स्नेहभोजन आणि १० वाजता बक्षीस वितरण समारंभ होईल. त्यानंतर १०.३० वाजता कौटुंबिक हृदयस्पर्शी जिव्हाळ्याचे दोन अंकी नाटक प्रवेश, रत्नलेखा निर्मित “कन्या ही सासुरासी जाये” (आयोजक : चिंद्रवळे (बौद्धवाडी)) ही नाट्य कलाकृती होईल.

या प्रसंगी बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना बौद्ध उपासक हेमंत रोहिणी अनंत पवार (तळवली) तथा पूर्वश्रमीचे भिक्खू अभिधम्मपाल यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून चिपळूण येथील डीबीजे कॉलेजचे प्राध्यापक तथा धम्मचारी जिनरुची (त्रिरत्न बौद्ध महासंघ, चिपळूण) के. एस .सावरे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!