जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत माजी सैनिकांसाठी मेळाव्याचे खेड येथे आयोजन

रत्नागिरी : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत ७ मे रोजी खेड तालुक्यातील काढसिद्धेश्वर मठ, तांबट (खोपी) येथे, ८ मे रोजी न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट अँड कॉमर्स, आंबवली येथे आणि ९ मे रोजी शिवतेज सेवाभावी संस्था, खेड येथे माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर नारी, वीर माता, वीर पिता यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या मेळाव्यात पेन्शनविषयक, अभिलेख कार्यालय विषयक, महासैनिक पोर्टलवर रजिस्ट्रेशन (नोंदणी) तसेच इतर अडचणी सोडविण्यात येणार आहेत. मेळाव्यात येताना आपल्या सोबत डिस्चार्ज पुस्तक, पीपीओची प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक, इसीएचएस कार्ड व आधार कार्डशी लिंक असेलेला मोबाईल फोन असणे आवश्यक आहे. या मेळाव्यास माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर नारी, वीर माता, वीर पिता यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सेवेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात येत आहे.



