क्रीडामुख्य बातमी

स्वसंरक्षण ही काळाची गरज : नगरसेविका सौ. मेधा कुलकर्णी 

संकेता संदेश सावंत यांचे कौतुक

रत्नागिरी : “स्वतःच संरक्षण करता येणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी तायक्वांदो सारखा मार्शल आर्टचा प्रकार आजच्या काळातल्या मुलींनी तसेच मुलांनीही अवश्य शिकून घ्यावा”, असे आवाहन नगरसेविका सौ. मेधा अविनाश कुलकर्णी यांनी केले आहे.

रत्नागिरी नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सहाच्या नगरसेविका सौ. कुलकर्णी यांनी ईगल तायक्वांदो प्रशिक्षण केंद्राच्या प्रशिक्षिका आणि राष्ट्रीय पंच संकेता संदेश सावंत यांची भेट घेतली यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले.

गेल्या वर्षभरापासून अभ्युदयनगर नगरपालिका बहुउद्देशीय सभागृहात ईगल तायक्वांदो प्रशिक्षण केंद्र सुरू आहे. या प्रशिक्षण केंद्रात आजूबाजूच्या परिसरातील मुले तायक्वांदो खेळाचे प्रशिक्षण घेत आहेत. नुकत्याच झालेल्या बेल्ट ग्रेडेशन परीक्षेतही या प्रशिक्षण केंद्रातल्या खेळाडूंनी उत्तम यश संपादन केले. या प्रशिक्षण केंद्रात मुलांना तायक्वांदोचे खेळाचं देत असतानाच संकेता सावंत यांनी नुकतेच लातूर तसेच गोवा येथे राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी पंच म्हणून काम केले. पदकविजेती खेळाडू, राष्ट्रीय पंच ते प्रशिक्षक अशा तिच्या या प्रवासाची नगरसेविका सौ. कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष भेटीत माहिती घेतली.

यावेळी ईगल तायक्वांदो प्रशिक्षण केंद्रासाठी लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. संकेता सावंत यांना पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी आणि भविष्यात उत्तम खेळाडू घडवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!