मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हाशैक्षणिक

संगमेश्वर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत समुपदेशन केंद्र स्थापन

रत्नागिरी : माहे ऑगस्ट/सप्टेंबर २०२५ मध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये होणाऱ्या प्रवेशाबाबतची माहिती देण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था संगमेश्वर येथे शासकीय सुट्टी वगळून रोज सकाळी १० ते ११ वाजता यावेळेत समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आला आहे. नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थचे प्राचार्य र. वि. कोकरे यांनी केले आहे.

इयत्ता दहावी व बारावी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आपल्या पाल्याला कोठे प्रवेश घ्यावा, याबाबत विचार करताना पालकांची तारांबळ होते. आयत्या वेळी निर्णय घेणे खूप अवघड होते. यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत माहे ऑगस्ट/सप्टेंबर २०२५ मध्ये होणाऱ्या प्रवेशाबाबतची माहिती देण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था संगमेश्वर येथे शासकीय सुट्टी वगळून रोज सकाळी १० ते ११ वाजता यावेळेत समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आला आहे. यामध्ये प्रवेशासाठी आवश्यक ट्रेड, आवश्यक कागदपत्रे व इतर माहिती देण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!