मुख्य बातमीसामाजिक
पालशेत येथील पूरग्रस्त कुटुंबाला मनसेची मदत

गुहागर : तालुक्यातील पालशेत येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पालशेत सावरपाटी येथील रहिवासी सुनील पटेकर यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरून फार मोठे नुकसान झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली पालशेत मनसे विभाग अध्यक्ष प्रसाद विखारे यांनी पटेकर कुटुंबीयांना भेट देऊन धीर दिला. तसेच मदत म्हणून जीवनावश्यक वस्तू दिल्या.



