मुख्य बातमी
जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी मतदानाला शांततेत सुरुवात

रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये आज (७ फेब्रुवारी) सकाळपासूनच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला उत्स्फूर्तपणे सुरुवात झाली आहे. रत्नागिरीमध्ये ५६ जिल्हा परिषद गट व ११२ पंचायत समितीच्या गणासाठी हे मतदान होत आहे. लांजा – राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी जिल्हा परिषद आदर्श विद्यामंदिर पाली १ येथे बजावला मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी वर्षा सामंत यादेखील उपस्थित होत्या. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे मतदानाचे प्रमाण लक्षणीय दिसून येत आहे.



