रोजगाराभिुख अल्पमुदत अभ्यासक्रमांचा उद्घाटन सोहळा संपन्न

रत्नागिरी : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये नव्या युगातील व रोजगारक्षम अभ्यासक्रमांचा शुभारंभ कार्यक्रम काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पध्दतीने संपन्न झाला.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमेश्वर येथे असोसिएट इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री), सुईग मशीन ऑपरेटर (टेलरिंग), प्लंबर जनरल (नळ कारागिर), फोअर व्हीलर सर्व्हिस असिंस्टंट (चार चाकी वाहन दुरुस्ती) हे रोजगाराभिमुख अल्पमुदत अभ्यासक्रम चालू करण्यात आले. शासनाच्या सूचनेनुसार संस्थास्तरावर या अभ्यासक्रमाचे उद्घाटन दिगंबर सोमलिंग लिंगायत (विश्वकर्मा लाभार्थी) यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपसरपंच नावडी विवेक शेरे यांनी भूषविले.
सूत्रसंचालन समीर पाणिंद्रे (शिल्पनिदेशक विजतंत्री) यांनी केले. संस्थेचे प्र. प्राचार्य अश्रफ मुल्ला, आय. एम. सी सदस्य कमलाकर मसुरकर, संस्थेतील निदेशक वर्ग, सर्व कर्मचारी वृंद, सर्व प्रशिक्षणार्थी, अन्य विद्यालयातील विद्यार्थी, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.



