संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत रत्नागिरी तालुक्यासाठी समिती

रत्नागिरी : संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत प्राप्त होणारे अर्ज छाननी करून निर्णय घेण्यासाठी रत्नागिरी तालुका पातळी संजय गांधी निराधार समिती स्थापन करण्यात आली आहे.
पालकमंत्री यांनी शिफारस केलेली संबंधित तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ती स्वप्नील मयेकर, मु.पो. कोतवडे हे या समितीचे अध्यक्ष असून मागासवर्गीय अशासकीय प्रतिनिधी सुनील जाधव (वाटद), महिला अशासकीय प्रतिनिधी अपर्णा बोरकर, (मु.पो. पानवल), इतर मागासवर्गीय अशासकीय प्रतिनिधी नामदेव चौघुले (मु. गडनरळ, पो. कोळीसरे), रूपेश पेडणेकर, (शिवाजीनगर, रत्नागिरी), सर्वसाधारण प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी मिलिंद खानविलकर (मु. पो. उक्षी), अपंग प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी श्रीकांत राऊत (मु. पो. पाली), संबंधित तालुक्यातील शासन नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेचा अशासकीय प्रतिनिधी सुशांत पाटकर (मु. दाभिळ अंबेरे, पो. डोर्ले), संबंधित तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ती अशासकीय प्रतिनिधी प्रतीक देसाई (मु. पो. जाकादेवी), संबंधित तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक अशासकीय प्रतिनिधी राजेश साळवी (मु. पो. मालगुंड), पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे सदस्य असून नायब तहसीलदार समितीचे सदस्य सचिव आहेत.



