मुख्य बातमी

कुणबी समाजोन्नती संघ मुंबईतर्फे कुणबी समाज नेते नंदकुमार मोहिते यांच्यासाठी २० एप्रिल रोजी आदरांजली सभा

आबलोली (संदेश कदम) : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई यांच्या वतीने कुणबी समाज नेते निसर्गवासी नंदकुमार मोहिते यांना आदरांजली वाहण्यासाठी रविवारी (२० एप्रिल) सायंकाळी ४ वाजता मुलुंड पूर्व येथील त्रिमूर्ती सभागृह, कुणबी विद्यार्थी वसतिगृह येथे आदरांजली सभा आयोजित करण्यात आली आहे.

माजी जिल्हा परिषद सदस्य व कुळ कायद्याचे गाढे अभ्यासक कुणबी समाजासह सर्वसामान्य जनतेचे नेते आणि शामराव पेजे महाविद्यालय अध्यक्ष व बहुजन विकास आघाडी या राजकीय पक्षाचे नेते निसर्गवासी नंदकुमार मोहिते यांचे ६ मार्च २०२५ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण कुणबी समाजावर एक आघात झाला होता. समाजात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने निसर्गवासी मोहिते यांना आदरांजली वाहण्यासाठी सभेचे आयोजन केले असून या सभेला कुणबी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य, केसीसीआय आणि बळीराज सेना यांच्यासह सर्व आमंत्रित संस्थांचे पदाधिकारी, तसेच मोहिते यांचे कुटुंबीय, हितचिंतक यांनी बहुसंख्येने वेळेत उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, कुणबी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य, बहुजन विकास आघाडी आणि बळीराज सेना महाराष्ट्र राज्य यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!