जिल्ह्यातील सर्व न्यायालयात मेडीएशन फॉर नेशन २.० विशेष मोहीम सुरू

रत्नागिरी : देशभरात २ जानेवारी २०२६ पासून सुरू असलेल्या मेडीएशन फॉर नेशन २.० या विशेष मोहिमेची जिल्ह्यातील सर्व न्यायालयात सुरुवात झाली आहे. या विशेष मोहिमे अंतर्गत २ जानेवारीपासून १५ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयात प्रलंबित दावे, वाद तडजोडपात्र खटले, मध्यस्थीद्वारे समझोत्याने मिटवली जाणार आहेत.
या अभियानातर्गत वैवाहिक वाद, मोटार अपघात प्रकरण, कौटुंबिक हिंसाचार, चेक बाऊस, वाणिज्य प्रकरणे, सेवा विषयक वाद, फौजदारी प्रकरणे, ग्राहक तक्रार मंचाची प्रकरणे, कर्ज वसूली, भूसंपादन, कामगार न्यायालय प्रकरणे, न्यायधिकरण प्रकरणे तसेच इतर दिवाणी प्रकरणे अशा विविध श्रेणीतील वाद निवडून मध्यस्थी प्रक्रियेसाठी संदर्भित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद यशवंतराव जाधव यांनी या अभियानात अधिकाधिक प्रकरणे मध्यस्थीद्वारे समझोत्याने मिटावीत त्यासाठी लोकांना आपले वाद मध्यस्थी केंद्राकडे पाठवावेत, असे आवाहन केले.

