मुख्य बातमी

रत्नागिरी जिल्ह्यातील ८४७ ग्रामपंचायतींमध्ये १७ सप्टेंबरला ग्रामसभा

रत्नागिरी : जिल्ह्यात १७ सप्टेंबरला ग्रामसभेचे आयोजन जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आले असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभागाचे सागर पाटील यांनी दिली. या ग्रामसभेला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

या ग्रामसभेला ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली विकासात्मक समिती काम करणार असून गावातील विविध विकास कामे शासन प्रशासन, लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने तसेच ग्रामपंचायतीच्या सेवेत पारदर्शकता आणतानाच गावातील माती, पाणी, स्वच्छता, जैवविविधतेचे व्यवस्थापन, गावातील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागातील कार्याला चालना देण्याच्या दृष्टीने ही ग्रामसभा महत्त्वाची ठरणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी रत्नागिरी जिल्ह्यात होणाऱ्या ८४७ ग्रामपंचायतीमधील ग्रामसभांना उपस्थित राहून सर्वांगिण विकास साधावा, असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!