मुख्य बातमी

रत्नागिरीत विज्ञान रथातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाचा प्रसार यशस्वी

रत्नागिरी : इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनने शहरातील रा. भा. शिर्के प्रशाला आणि पटवर्धन हायस्कूल येथे विज्ञान रथ या उपक्रमाचे आयोजन केले होते. विज्ञान रथ ही फिरती प्रयोगशाळा असून, याद्वारे विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी काम केले जाते.

ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांची विज्ञानातील समज वाढविण्यासाठी विज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जाण्याचे काम चेन्नई येथील रोटरी क्लब ऑफ विरुधुनगरने ठरविले आणि प्रशिक्षक नविनकुमार विद्यार्थ्यांसमोर विज्ञानातील अनेक प्रयोग मनोरंजक पद्धतीने सादर करत भारतभर भ्रमण करीत आहेत. रत्नागिरीतील शिर्के प्रशाला आणि पटवर्धन हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी विज्ञानातील अनेक प्रयोग समजून घेत का, कसे, कशासाठी अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळविली. दोन्ही शाळेच्या मिळून ८०० विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.

या उपक्रमास शिर्के प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. कांबळे, श्रीमती पवार, पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापक श्रीमती घाटविलकर यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास भारत शिक्षण संस्थेचे श्री. हातखंबकर, श्री. वीरकर, सर्व शिक्षक आणि इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरीच्या अध्यक्ष सौ. ऋचा गांधी, सचिव सौ. सुवर्णा चौधरी, सौ. श्रद्धा सावंत व इतर सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!