मुख्य बातमी

नररत्न श्रीमान भागोजीशेठ कीर पूर्णाकृती पुतळा असलेल्या स्मारकाचे लोकार्पण  

रत्नागिरी : पतित पावन मंदिर, भागेश्वर मंदिर, गोशाळा यांसारख्या अनेक महत्त्वाच्या संस्थांच्या उभारणीत मोलाचा वाटा उचललणारे नररत्न श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या पुर्णाकृती पुतळा असलेल्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाला.

भंडारी समाजाचे श्रद्धास्थान असलेले भागोजीशेठ कीर यांचा भव्य पुतळा उभारण्याचा भंडारी समाजाला दिलेला शब्द पाळत, व्यवसाय आणि दानशूरतेने रत्नागिरी शहराचा नावलौकिक वाढविणा-या श्रीमान भागोजीशेठ कीर यांचा पूर्णाकृती पुतळा त्यांच्या कार्याचे स्मरण करुन देण्यासोबतच पुढील पिढीपर्यंत एक प्रेरणादायी वारसा पोहचवेल असा मला विश्वास आहे, असे यावेळी पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.

या सोहळ्याला नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, नगरसेवक राजीव कीर, मुन्ना सुर्वे, राजेंद्र महाडिक, बंड्या साळवी आदी उपस्थित होते. या सोहळ्याला भंडारी समाज बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!