मुख्य बातमी

देव-घैसास-कीर महाविद्यालयामध्ये ‘इकोव्हिजन २०२६’ या विषयावर अर्थशास्त्रीय प्रदर्शनाचे आयोजन

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाचे देव, घैसास, कीर महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इकोव्हिझन २०२६’ या विषयावर अर्थशास्त्रीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

अर्थशास्त्र हे केवळ पैशाचे शास्त्र नसून ते आपल्या दैनंदिन जीवनाचा आणि देशाच्या प्रगतीचा मुख्य आधार आहे असे वक्तव्य अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. स्मार्था कीर यांनी त्यांच्या प्रास्ताविकेतून केले. या अनुषंगाने महाविद्यालयातील अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्र विषयक विविध संकल्पना कल्पक अशा मॉडेल्स,पोस्टर्स आणि रांगोळी द्वारे सादर केल्या. प्रदर्शनामध्ये १८ मॉडेल्स व ९ पोस्टर्सचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. या प्रदर्शनाला गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागातील प्रा.डॉ. दिनेश माश्रणकर, प्रा. शेकुराव पोटे, प्रा. सुर्यकांत माने यांनी भेट दिली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयातील व गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली.

विद्यार्थ्यांनी केलेल्या या उपक्रमाचे महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या सौ. पाटील यांनी कौतुक केले व अशाच प्रकारचे नवनवीन उपक्रम महाविद्यालयामध्ये राबवले जावे, अशी आशा व्यक्त केली.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ. वसुंधरा जाधव, कला शाखाप्रमुख प्रा. ऋतुजा भोवड, वाणिज्य शाखाप्रमुख व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक प्रा. राखी जाधव, विज्ञान शाखाप्रमुख प्रा. वैभव घाणेकर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. स्मार्था कीर यांसोबत इतर प्राध्यापक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदांत वायंगणकर (द्वितीय वर्ष कला शाखा) याने केले. प्रचिती घाणेकर (द्वितीय वर्ष कला शाखा) हिने उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!