आबलोलीतील शिमगोत्सवानंतर सहाणेजवळील संपूर्ण परिसरात विद्यार्थांनी राबवले स्वच्छता अभियान
चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय आबलोली यांचा स्तुत्य उपक्रम

आबलोली : गुहागर तालुक्यातील आबलोली येथे आबलोली आणि खोडदे येथील ग्रामदेवता श्री नवलाईदेवींच्या पालखी भेटीचा आणि तिन्ही बहिणींच्या गळाभेटीचा सोहळा उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला. या सोहळ्याला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी या ठिकाणी पसरलेली खाऊची पाकिटे, प्लास्टिक बाटल्यांचा कचरा चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय आबलोली या विद्यालयाच्या इयत्ता ५ वी ते इयत्ता ९ वीच्या विद्यार्थांनी शिक्षकांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान राबवून गोळा केला. संपूर्ण परिसराची साफसफाई करत गोळा केलेल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली.

आबलोलीत झालेल्या या शिमगोत्सवाला आबलोली, खोडदे गावातील सर्व ग्रामस्थ फाल्गुन पौर्णिमेच्या सकाळी सुर्योदयाबरोबर आबलोली आणि खोडदे गावातील होम गावचे खोत, मानकरी, गावकर यांच्या हस्ते पेटविण्यात आले. दुपारनंतर आबलोली येथील श्री नवलाईदेवी, खोडदे गणेशवाडी येथील श्री नवलाईदेवी, सहानेचीवाडी येथील श्री नवलाईदेवी या तीन बहिणींच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा कै. दादा कारेकर यांच्या जागेतील मैदानात उत्साहात, जल्लोषात संपन्न झाला.
या सोहळ्यात सहाणेजवळील आजूबाजूच्या जागेत जत्रा भरते. यावेळी आबलोली, खोडदे गावासह पंचक्रोशीतील जनता या संपूर्ण शिमगोत्सव आणि जत्रा उत्सवात खरेदीचा आनंद लुटते. यावेळी खाऊची रिकामी पाकिटे, प्लास्टिकच्या बाटल्या आणि अन्य कचरा या संपूर्ण जत्रेच्या परिसरात पडलेला असतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या संपूर्ण जागेतील कचरा चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय आबलोली या विद्यालयाच्या ५ वी ते ९ वीच्या विद्यार्थांनी शिक्षकांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान राबवून गोळा केला. संपूर्ण परिसराची साफसफाई करून हा कचरा एकत्र करत त्याच योग्य विल्हेवाट लावली. शाळेने जपलेल्या या सामाजिक बांधिलकीबद्दल या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना धन्यवाद देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.



