मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

जगबुडी पूल टँकर अपघात; टँकर चालकावर गुन्हा दाखल

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीच्या पुलावर झालेल्या टँकर अपघाता प्रकरणी अखेर खेड पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. या अपघातामुळे नदीत इथेनॉल रसायन मिसळून मोठे जलप्रदूषण झाले होते, ज्याचा फटका स्थानिक पाणीपुरवठा योजनांना बसला आहे.

काल (४ एप्रिल) रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीच्या पुलावर हा भीषण अपघात झाला होता. इथेनॉल वाहून नेणारा टँकर पुलावर उलटल्याने त्यातील मोठ्या प्रमाणावरील रासायनिक द्रव थेट नदीच्या पात्रात मिसळले. यामुळे नदीचे पाणी दूषित होऊन परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि महसूल प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रसायनामुळे होणारे प्रदूषण पाहता खबरदारीचा उपाय म्हणून खेड नगर परिषदेसह आजूबाजूच्या गावांतील जॅकवेल तातडीने बंद करण्यात आले. नदीकाठच्या विहिरींचा पाणीपुरवठा काही काळ थांबवण्यात आला होता. रिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी

प्रशासकीय यंत्रणेला मोठी कसरत करावी लागली. या दुर्घटनेमुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण झाल्याने आणि पर्यावरणाचे नुकसान झाल्याने, काल रात्री उशिराने खेड पोलीस ठाण्यात टँकर चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, सुरक्षेच्या कारणास्तव नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!