मुख्य बातमी

रत्नागिरी जिल्ह्यात १८ शाळा कायमस्वरूपी अपात्र

रत्नागिरी : वारंवार होणाऱ्या मूल्यमापन प्रक्रियेत शासनाने घालून दिलेल्या सुधारित निकषांची पूर्तता न करणाऱ्या १८ शाळांना तसेच कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या २ तुकड्यांना राज्य शासनाने कायमस्वरूपी अपात्र घोषित केले आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील खासगी शिक्षण संस्थांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

या पार्श्वभूमीवर रत्नागिरीसह कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काही शाळांवरही कारवाई करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १८ संस्था अपात्र ठरल्या असून त्यापैकी ११ उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालये, ५ प्राथमिक शाळा आणि २ तुकड्यांचा समावेश आहे.

चिपळूण व खेड तालुक्यातील पाच प्राथमिक शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये रामचंद्र पाटणे ज्ञानदीप विद्यामंदिर, भडगाव (ता. खेड), एसपीएम इंग्लिश प्राथमिक शाळा (ता. चिपळूण), सह्याद्री शिक्षण संस्था प्राथमिक शाळा, सावर्डे (ता. चिपळूण), लक्ष्मीबाई बाळासाहेब माटे प्राथमिक विद्यालय, कामथे (ता. चिपळूण) आणि एमआयएकजी प्राथमिक शाळा, खेड यांचा समावेश आहे.

अपात्र ठरलेल्या शाळा व तुकड्यांना यापुढे वेतन अनुदान मिळणार नसून, नियमानुसार त्यांची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे. अन्यथा संबंधित संस्थांना ‘स्वयं अर्थसहाय्यित’ तत्त्वावर शाळा चालवावी लागणार आहे. यासाठी वेळेत अर्ज करणे बंधनकारक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, शासनाच्या या निर्णयाविरोधात खासगी शिक्षण संस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून परिपत्रक तात्काळ मागे घ्यावे, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!