मुख्य बातमी

भरणे येथे गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर

रत्नागिरी : खेड तालुक्यातील बहुउद्देशीय हॉल, नवभारत हायस्कूल भरणे येथे ३० एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांनी केले आहे.

महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नाचे निराकरण करणेव जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर अशा शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!