मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

प्रतिस्पर्ध्यांना मी कधीच कमी लेखत नाही : निलेश सुर्वे

आबलोली (संदेश कदम) : “गेली २४ वर्ष मी राजकारणात आहे. राजकारणाबरोबर समाजकारण करताना मी कधीही दुजा भाव केला नाही. मी पडवे पंचायत समिती गणातून कमळ निशाणी घेऊन निवडणूक लढवत आहे. मी या गणात स्थानिक उमेदवार असून शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, आरपीआय महायुतीचा उमेदवार आहे. मी एक-एक माणूस जोडला आहे. राजकारणात असताना प्रतिस्पर्ध्यांना मी कधीच कमी लेखत नाही,” असे भाजपचे माजी तालुका अध्यक्ष आणि पडवे पंचायत समिती गणातील उमेदवार निलेश सुर्वे यांनी स्पष्ट केले.

गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका चांगल्याच रंगात आल्या असून प्रचाराचे वातावरण ही तापले आहे.

सुर्वे पुढे म्हणाले की, “माझ्याबरोबर या गणाच्या बाहेरील गावातील म्हणजे पाचेरी सडा मधील पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र आंबेकर हे मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. शिर पंचायत समिती गणामध्ये मासू गावातील आनंद भोजने हे कपबशी या निशाणीवर निवडणूक लढवत आहेत. पण मी पडवे पंचायत समिती गणामधील स्थानिक उमेदवार असून माझ गाव पडवे पंचायत समिती गणात आहे. आणि मतदारांचा चांगलाच प्रतिसाद मला मिळत आहे.”

सुर्वे पुढे म्हणाले की, “आव्हान शंभर टक्के आहे. पण आव्हान पूर्ण करण्याची ताकदही याच पंचायत समिती गणातील स्थानिक मतदारांनी मला दिलेली आहे. सगळ्यांचे एकच म्हणणे आहे की निलेश सुर्वे हा नाटेकर यांच्या माध्यमातून पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जातोय. या गणातील स्थानिक उमेदवार आहे. आपल्या गरजेला अडल्या, नडल्याला उपयोगी पडणारा उमेदवार म्हणजे निलेश सुर्वे. त्यामुळे निलेश सुर्वे यांना निवडून द्यायचा निश्चय इथल्या मतदारांनी केलेला आहे.”

“५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पडवे गटातून शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, आरपीआय या घटक पक्षांचे महायुतीचे उमेदवार महेश नाटेकर आणि पंचायत समिती पडवे गणासाठी मी स्वतः निलेश विश्वनाथ सुर्वे निवडणुकीला सामोरे जात आहोत. या गटातील आणि गणातील मतदारांनी महेश नाटेकर आणि निलेश सुर्वे यांना विजयी करा असे आवाहनही त्यांनी केले.

केंद्रात आणि राज्यात केंद्रात महायुतीची सत्ता आहे आणि या दोन ठिकाणी सत्ता असताना जि. प. आणि पं. स. गटातील आणि गणातील मतदारांचा कल हा आमच्या बाजूने असल्याने आमचा विजय निश्चित झाला आहे. गेली २४ वर्ष मी राजकारणात एक निष्ठेने भाजपाचे काम आणि सेवा करीत असताना संघटनेत अनुभव माझ्या पाठीशी चांगलाच आहे. त्याचबरोबर महायुतीचे कार्यकर्ते या गटात आणि दोन्ही पंचायत समिती गणात घरोघरी जाऊन प्रचार यंत्रणा जोरदार राबवित असल्याने महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास सुर्वे यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!