मुख्य बातमी

मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश नारायणराव राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नागिरीत भव्य ‘मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. ‘आ. निलेशजी राणे मित्र मंडळ, रत्नागिरी’ आणि इन्फिगो आय केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे. ज्या गरजू रुग्णांना या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

रुग्णांनी नाव नोंदणीसाठी खासदार नारायणराव राणे संपर्क कार्यालय, आरोग्य मंदिर, रत्नागिरी येथे किंवा अमोल देसाई (8999251217), नरेश बनसोडे (9158161085), सोम पिलणकर (7972924778), अभी कारेकर (7057576474), निखिल शेट्ये (8446255751) यांच्याशी संपर्क साधावा. सर्व गरजू रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!