‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजने’तून भूमिहीन कुटुंबांना मिळणार शेतजमीन
समाज कल्याण विभागाकडून अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन कुटुंबांना शेतीसाठी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी ‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी त्वरित अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शीतल सोनटक्के यांनी केले आहे.
जमीन व आर्थिक तरतूद :
कोरडवाहू (जिरायती) जमीन – कमाल ४ एकरपर्यंत (प्रति एकर कमाल रु. ५ लाख मर्यादेत).
ओलिताखालील (बागायती) जमीन – कमाल २ एकरपर्यंत (प्रति एकर कमाल रु. ८ लाख मर्यादेत).
पात्रतेचे निकष असे : अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील असणे आवश्यक, अर्जदार दारिद्र्यरेषेखालील (BPL) भूमिहीन असावा. अर्जदाराचे वय १८ ते ६० वर्षे दरम्यान असणे बंधनकारक आहे.
दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन परित्यक्ता महिला, तसेच दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन विधवा महिला तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (Atrocity Act) बाधित व्यक्ती/कुटुंब यांना निवडीमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे.
इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पहिला मजला, कुवारबाव, रत्नागिरी येथे संपर्क साधून अर्ज सादर करावेत.


