मुख्य बातमीसामाजिक
जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरीतर्फे वृक्षारोपण

रत्नागिरी : जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरीतर्फे शहराजवळील भाटीमिऱ्या, सडामिऱ्या म्हसोबा देऊळ रस्ता येथे वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला.
यावेळी भाटीमिऱ्या, दत्तमंदिर मुख्य रस्त्यापासून म्हसोबा मंदिर कडे जाणाऱ्या रस्त्यावर तीस उंडण जातीच्या रोपांची लागवड करण्यात आली. खाऱ्या पाण्याचे वातावरण उंडण जातीच्या झाडांसाठी पोषक असते. त्यामुळे वृक्षारोपणासाठी या जातीच्या झाडांची निवड करण्यात आली.
यावेळी जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष महेश दामले तसेच स्पेशल कमिटी मेंबर मिलिंद सावंत सदस्य विजय पोकळे, संजय पुराणिक, भारत इदाते आणि दैविक तारे, संकेत ढेरे, श्रेयस गावकर हे उपस्थित होते.



