मुख्य बातमी

रत्नागिरी जिल्ह्यात उद्या फुटणार सुमारे अडीच हजार दहीहंड्या 

गोविंदा पथके सज्ज : सार्वजनिक हंड्यांमध्ये घट, तर खासगी दहीहंड्यांमध्ये वाढ

रत्नागिरी : उद्या (५ सप्टेंब) साजऱ्या होणाऱ्या गोपाळकाला उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, उंच उंच मानवी मनोरे रचण्यासाठी गोविंदाही सज्ज झाले आहेत. यंदा जिल्ह्यात एकूण २ हजार ५७८ दहीहंड्या उभारण्यात येणार आहेत.

शहरासह जिल्हाभरात उभारण्यात येणाऱ्या हंड्या फोडण्यासाठी स्थानिक पथकांसह जिल्ह्याबाहेरूनही गोविंदा पथके दाखल होतात. यंदा दहीहंड्यांच्या थरांबरोबर ठेवलेल्या बक्षिसांच्या किंमतीतही भरघोस वाढ झाली असून, या हंड्या फोडण्यासाठी आणि उंच मानवी मनोरे रचण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये मोठी होणार आहे. सर्वाधिक दहीहंड्या या जयगड, खेड, दापोली, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, मंडणगड, बाणकोट, दाभोळ येथे फोडण्यात येणार आहेत.

यावर्षी जिल्ह्यात २८५ सार्वजनिक आणि २ हजार २९३ खासगी दहीहंड्यांचे आयोजन केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सार्वजनिक दहीहंड्यांच्या संख्येत १८७ ने घट नोंदवली गेली असली, तरी खासगी दहीहंड्यांमध्ये १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे चित्र आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!