मुख्य बातमी

नागरिकांसाठी टपाल विभागातर्फे विशेष ‘गणपती नाईट कॅम्प’चे आयोजन; विविध सेवा एकाच छताखाली उपलब्ध

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या काळात टपाल विभागाच्या विविध सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सुरक्षित बचत, विमा, पार्सल तसेच आधुनिक टपाल सेवांचा लाभ एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी भारतीय टपाल विभागातर्फे रत्नागिरी विभागात २२ ते २४ सप्टेंबर या कालावधीत विशेष ‘गणपती नाईट कॅम्प’चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागाच्या डाकघर अधीक्षकांनी केले आहे.

हे नाईट कॅम्प कुटुंबे, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, नोकरदार, लहान व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून नागरिकांना थेट टपाल अधिकाऱ्यांशी संवाद साधून वैयक्तिक मार्गदर्शन मिळवता येईल.

शिबिरामध्ये उपलब्ध असणाऱ्या प्रमुख सेवा:

• मेल व पार्सल सेवा: स्पीड पोस्ट, नोंदणीकृत टपाल, बिझनेस मेल सोल्यूशन्स, ई-कॉमर्स पार्सल आणि विश्वसनीय वितरण सुविधा.

• आंतरराष्ट्रीय टपाल: आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट (EMS), हवाई पार्सल आणि ट्रॅक्ड पॅकेट सेवा; निर्यातदारांसाठी बुकिंग व कागदपत्रांचे वन-स्टॉप सोल्यूशन.

• विमा सेवा (PLI / RPLI): देशातील सर्वात जुनी जीवन विमा योजना. व्यावसायिक, पदवीधर व डिप्लोमा धारकांसाठी पोस्टल लाईफ इन्शुरन्स (PLI), तसेच सक्रिय बचत खातेधारकांसाठी ग्रामीण पोस्टल लाईफ इन्शुरन्स (RPLI) उपलब्ध.

• पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँक: आकर्षक व्याजदर आणि सुरक्षित बचतीसह घरपोच बँकिंग सुविधा.

• नागरिक केंद्रीत सेवा (CCS): सहभागी केंद्रांवर आधार-संबंधित सेवा उपलब्ध असतील.

उपविभागनिहाय शिबिरांचे वेळापत्रक (वेळ: सायं. ७.३० ते रात्री ११.३०):

• लांजा उपविभाग (दि. २२ सप्टेंबर):

◦ स्थान: गोंधळी समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पाली, रत्नागिरी

◦ संपर्क: डाकघर निरीक्षक श्री. एस. एस. बेल्हेकर (मो. ८२७५९२९९३४)

• राजापूर उपविभाग (दि. २३ सप्टेंबर):

◦ स्थान: जैतापूरचा राजा सार्वजनिक मंडळ, जैतापूर

◦ संपर्क: डाकघर निरीक्षक श्री. योगेश पी. जाधव (मो. ७८८७५६५८५८)

• देवरूख उपविभाग (दि. २४ सप्टेंबर):

◦ स्थान : देवरूख पोलीस स्टेशन गणपती मंडळ, देवरूख

◦ संपर्क : डाकघर निरीक्षक श्री. शरद खंदारे (मो. ९६७३५९८७६१)

स्थानिक नागरिकांनी या नाईट कॅम्पना भेट देऊन टपाल विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन टपाल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!