क्रीडामुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
गुरव ज्ञाती समाजाच्या गुहागर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांना प्रारंभ

आबलोली (संदेश कदम) : हिंदू भाविक गुरव ज्ञाती समाज गुहागर तालुका यांच्या वतीने गुहागर तालुका मर्यादित ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा, गुरव प्रीमियर लीग सलग पाचव्या वर्षीही आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेला शनिवारी (२७ डिसेंबर) मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. ही स्पर्धा येथे व्याघ्रंबरी मंदिर शेजारी, भाटावन मैदान गुहागर गुरववाडी येथे होत आहे.
आज (२८ डिसेंबर) साखळी सामने व अंतिम सामने खेळवण्यात येतील. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता या स्पर्धेचा बक्षीस सोहळा होईल. याप्रसंगी गुहागर तालुक्यातील क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



