महास्वयंम वेबपोर्टलच्या माध्यमातून ११ फेब्रुवारी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

रत्नागिरी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार मार्गदर्शन केंद्राद्वारे बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्यादृष्टीने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता राणी लक्ष्मीबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलीची), नाचणे रोड, पी. एमआयडीसी रत्नागिरी येथे होणार आहे.
जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापनांनी, उद्योजकांनी आपल्याकडे उपलब्ध असलेली रिक्त पदे www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर अधिसूचित करून जिल्ह्यातील उमेदवारांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापनांनी, उद्योजकांनी आपल्याला दिलेला युझर आयडी व पासवर्डचा वापर करून रिक्त पदे ऑनलाईन अधिसूचित करावी व प्रत्यक्ष रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उमेदवारांची निवड करून रोजगार उपलब्ध करून द्यावा.
या रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी नसल्यास कार्यालयाकडे त्वरीत संपर्क साधून नोंदणी करावी व रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त मोरेश्वर दुधाळ यांनी केले आहे.


