आबलोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आबलोली (संदेश कदम) : आबलोलीचे (ता. गुहागर) तंटामुक्ती समिती अध्यक्ष आणि बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर (रजि.) संस्थेचे उपाध्यक्ष विद्याधर राजाराम कदम तथा आप्पा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान तसेच “हिंद-दी-चादर अभियान”अंतर्गत निर्मल ग्रामपंचायत आबलोली आणि जिल्हा आरोग्य रुग्णालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर आबलोलीतील गारवा कृषी पर्यटन केंद्रात झाले. शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर रक्तदान शिबिराला प्रारंभ करण्यात आला.
यावेळी निर्मल ग्रामपंचायत आबलोली सरपंच सौ. वैष्णवी नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य सौ. वृषाली वैद्य, सौ. पायल गोणबरे, यशवंत बागडे, अनंत पागडे, दत्ताराम कदम, पोलीस पाटील महेश भाटकर, माजी सरपंच महेंद्र (आप्पा) कदम, प्रमेय आर्यमाने, कृषी सहाय्यक बेले, दत्ताराम कदम, सचिन कारेकर यांच्यासह रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाचे डॉ. आकाश पन्हाळे, डॉ. अथर्व बेंद्रे, सृजा पवार, मानसी भाटकर, जयश्री मॅथ्यू, प्रमोद चाटे, अमित जगताप, संदीप वाडेकर, विश्वदीप कदम, योगेश भोसले, विक्रांत पागडे, सुजय पवार, योगेश गोवळकर, सुमित पवार, सुशांत साळवी, मनीष कदम, नितीन मोहिते, वैभव निवाते, समीर शिंदे यांच्यासह अनेक रक्तदाते, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.



