मुख्य बातमी
महिला लोकशाही दिन २० एप्रिल रोजी

रत्नागिरी : एप्रिल महिन्याचा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवारी (२० एप्रिल) रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात होणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे सदस्य सचिव यांनी दिली.
जिल्हास्तरावर दर महिन्याला तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो. यावेळी अर्जदार महिला स्वतः उपस्थित राहून त्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने निवेदन सादर करतात व त्यानुसार जिल्हा स्तरावरील संबंधित अधिकारी यांना महिलांचे वैयक्तिक प्रश्नांच्या कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात येतात.



