मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

एसटीच्या उपहारगृहात मंत्र्यांनी घेतला वडापावचा आस्वाद

संगमेश्वर बस स्थानकात प्रवाशांशी साधला थेट संवाद

चिपळूण : महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी रात्री संगमेश्वर बसस्थानकाला भेट देत प्रवाशांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बसस्थानकातील उपहारगृहात प्रवाशांसोबत बसून वडापाव आणि कॉफीचा आस्वाद घेतल्याने उपस्थित प्रवाशांमध्ये उत्सुकता निर्माण झाली.

कोकण दौऱ्यावर असलेल्या सरनाईक यांनी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर येथील नव्याने उभारलेल्या बसस्थानकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी बसस्थानकातील विविध सुविधांचा आढावा घेतला. प्रसाधनगृहे, हिरकणी कक्ष, प्रतीक्षालय तसेच इतर प्रवासी सुविधांची पाहणी करून स्वच्छता आणि व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले.

पाहणीदरम्यान त्यांनी बसस्थानकातील उपहारगृहालाही भेट दिली. तेथे उपस्थित प्रवाशांशी संवाद साधत त्यांनी उपहारगृहातील वडापाव आणि कॉफीचा आस्वाद घेतला. तसेच प्रवाशांकडून एसटी सेवांबाबतच्या प्रतिक्रिया आणि सूचना जाणून घेतल्या.

मंत्र्यांनी कोणताही औपचारिकपणा न ठेवता सर्वसामान्य प्रवाशांमध्ये बसून संवाद साधल्याने अनेक प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. संगमेश्वर बसस्थानकातील स्वच्छता, सुविधा आणि उपहारगृहातील सेवा याबाबतही त्यांनी माहिती घेतली.

दरम्यान, संगमेश्वर बसस्थानकातील या भेटीतून एसटी प्रशासनाकडून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांवर भर देण्यात येत असल्याचे दिसून आले. प्रवाशांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्नही यावेळी करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!