मुख्य बातमी

पेट्रोलियम पदार्थांच्या खरेदी-विक्रीवर मर्यादा

इंधन पुरवठ्यासाठी कंपन्यांच्या 'फ्युएलेंट व सेल्स ऑफिसर्स'ची नियुक्ती

रत्नागिरी : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या १२ जून २०२६ च्या आदेशान्वये राज्यात पेट्रोलियम पदार्थांच्या खरेदी-विक्रीवर मर्यादा घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व संस्थात्मक, औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांनी किरकोळ विक्री केंद्रांमधून (रिटेल पंपांवरून) पेट्रोल व डिझेलची खरेदी करू नये. अशा ग्राहकांनी केवळ घाऊक ग्राहकांसाठी (Bulk Consumers) असलेल्या पंपांवरूनच इंधन खरेदी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

शासनाच्या १६ जून २०२६ च्या पत्राद्वारे ‘बल्क हाय स्पीड डिझेल’ ग्राहकांना इंधन पुरवठा करणाऱ्या विविध पेट्रोलियम कंपन्यांच्या ‘फ्युएलेंट व सेल्स ऑफिसर्स’ची नियुक्ती करून त्यांची नावे व संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आली आहेत.

बीपीसीएल कंपनीचे अरविंथा कुमार, मो. नंबर. ९५००४७०१९८, ई मेल आयडी : aravinthakumare@bharatpetroleum.in आयओसीएल कंपनीचे शगुन रेड्डी, मो.नंबर.९८३३८१३३१० ई मेल आयडी: ShettySP@indianoil.in एचपीसीएल कंपनीचे भूषण एकनाथ चौधर मो. नंबर ९५९४८२०७५४, ई मेल आयडी: bhushan.chaudhari@hpcl.in, बल्क पर्चेसर (मोठी खरेदी असणारे ग्राहक) यांनी परस्पर संबंधितांशी संपर्क करून आवश्यक ते इंधन प्राप्त करुन घ्यावे. कोणत्याही कंझ्युमर/रिटेल पंपावरुन असे इंधन प्राप्त करून घेता येणार नाही, अशी माहिती प्र. जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!