मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

कुणबी विकास मंडळ असोरे यांच्या वतीने उपसभापती निलेश सुर्वे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील कुणबी विकास मंडळ असोरे (रजि.) यांच्या वतीने असोरे गावात वृक्षारोपणाचा उपक्रम नुकताच उत्साहात संपन्न झाला. “आपलं गाव.. आपला अभिमान… विकासासाठी सर्वांचे योगदान” या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन पर्यावरण संवर्धन आणि हरितगृह निर्मितीसाठी असोरे कुणबी विकास मंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या प्रसंगी जांभूळ, चिंच आणि बकुळ या प्रकारातील १०० वृक्षांची लागवड यावेळी असोरे गावात विविध ठिकाणी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. विशेष म्हणजे या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी कुणबी विकास मंडळ असोरे मुंबईचे ३२ युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

कुणबी वाडी विकास मंडळ असोरे ज्ञाती सभागृहात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमाचे वेळी विनायक सुर्वे, असोरे कुणबी वाडी विकास मंडळाचे अध्यक्ष दिनेश डिंगणकर, गावातील प्रमुख कृष्णा बादावटे, निवृत्त ग्रामविकास अधिकारी महेंद्र निमकर, संतोष आग्रे, राजेंद्र गोंधळी, रामचंद्र गोंधळी, गोविंद गोंधळी, वसंत बादावटे, बबन बादावटे, सखाराम गोंधळी, विनय गोंधळी, महादेव गोंधळी, शांताराम गोंधळी, बौद्धजन सेवा संघ असोरेचे अध्यक्ष सुनील सुर्वे, सेक्रेटरी सुभाष सुर्वे आदींसह असोरे गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. या सत्कारावेळी असोरे गावातील सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने या कार्यक्षम ग्रामस्थांसमवेत आपणही कटिबद्ध असल्याचे उपसभापती निलेश सुर्वे यांनी आवर्जून सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!