महाराष्ट्रमुख्य बातमी

सीनियर जर्नालिस्ट फेडरेशन ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी ओमप्रकाश शिंदे; सरचिटणीसपदी संजय जोशी

कोकण कोल्हापूर विभाग अध्यक्ष पदी राजेंद्र मकोटे यांची नियुक्ती : नोव्हेंबरमध्ये पुण्यात भव्य अधिवेशन

अहिल्यानगर : सीनियर जनरल फेडरेशन ऑफ इंडियाच्या (SJFOI) महाराष्ट्र अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार ओम प्रकाश शिंदे (जालना ), तर संजय जोशी (पुणे) यांची सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अहिल्यानगर येथे झालेल्या कार्यकारिणी बैठकीत राष्ट्रीय सचिव डॉ. जयपाल पाटील यांनी महाराष्ट्र कार्यकारिणीची नावे करताना महाराष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून ॲड. गोपाळ शेळके, तर खजिनदार म्हणून डॉ. जयपाल पाटील, कायदेशीर सल्लागार म्हणून ॲड. ओंकार माने व ॲड. सुनील रावडे यांची ही नावे घोषित केली.

अहिल्यानगर येथे झालेल्या सीनिअर जर्नालिस्ट फेडरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र कार्यकारिणी सभेत डॉ. जयपाल पाटील यांनी कार्यकारीणीबद्दल माहिती देताना सांगितले की, राष्ट्रीय पातळीवर या नावावर संमती देण्यात आली असून राष्ट्रीय अध्यक्ष संदीप दीक्षित आणि उपाध्यक्ष व महाराष्ट्राच्या निरीक्षक श्रीमती सुहासिनी प्रभूगावकर यांच्या आदेशाप्रमाणे ही कार्यकारिणी घोषित करण्यात आली. तसेच फेडरेशनची कायदेशीर नोंदणी पुणे येथे सहकार निबंधक यांच्याकडे दाखल केली असून जुलै महिन्यात रितसरपणे ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तसेच फेडरेशनचे महाराष्ट्र शाखेचे अधिवेशन २५ व २६ नोव्हेंबर महिन्यात पुणे येथे घेण्यात येणार आहे, त्याबद्दलही त्यांनी माहिती दिली.

नव्याने नियुक्ती झालेले महाराष्ट्र राज्याचे फेडरेशनचे अध्यक्ष ओम प्रकाश शिंदे यांचा पत्रकारिता क्षेत्रात प्रदीर्घ असा अनुभव असून ते ३५ वर्ष ते कार्य करीत आहेत. महाराष्ट्र राज्यातील अनेक पत्रकार संघटना व पत्रकारांशी त्यांचा संबंध आहे. तर सरचिटणीस पदी नियुक्ती झालेले संजय जोशी यांचा पत्रकारिता आणि जनसंपर्क यासोबत वृत्तपत्र व्यवस्थापन, जाहिरात आणि वितरणाच्या क्षेत्रात मोठा ३३ वर्षे असा प्रदीर्घकाळ व्यावसायिक अनुभव आहे. राज्यातील अनेक महत्त्वाच्या व नामांकित वृत्तपत्रांमधून त्यांनी कार्य केलेले आहे. राज्यातील प्रत्येक विभागात त्यांचे वृत्तपत्रांत व संपादक पत्रकारांशी स्नेह आहेत. तसेच इतर राज्यातही त्यांचा जनसंपर्क आहे. त्यामुळे ज्येष्ठ पत्रकारांच्या प्रलंबित असलेल्या अनेक समस्या सोडविण्यासाठी फेडरेशनच्या माध्यमातून ते कसोशीने प्रयत्न करतील याबद्दल खात्री आहे.

यावेळी राज्याच्या विविध विभागाची विभागाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांचीही नावे घोषित करण्यात आली त्याप्रमाणे – पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष म्हणून भगवानराव परळीकर, कोल्हापूर जिल्हा आणि कोकण विभाग अध्यक्ष राजेंद्र मकोटे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष यादवराव पावशे, मराठवाडा विभाग अध्यक्ष म्हणून मकरंद जहागीरदार यांची तर रायगड अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार प्रदीप पाटील (उरण), सरचिटणीस ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत सहस्रबुद्धे (महाड), उपाध्यक्ष सौ. भारती शहा (खोपोली) यांची नियुक्ती घोषित करण्यात आली. कार्यकारिणी बैठकीसाठी ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख, आयेशा शेख मुलानी, बालाजी अडियल, अभय कुमार यादव, सौ. भारती शहा हेही उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!