चिपळुणात २४ सप्टेंबरला ‘श्री गणेशा… कला आणि संस्कृतीचा’ सोहळा
गणेशोत्सव राज्य महोत्सवांतर्गत आयोजन : सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

चिपळूण : गणेशोत्सव राज्य महोत्सवांतर्गत सांस्कृतिक समृद्धी आणि लोककलांचा संगम घडविणारा ‘श्री गणेशा… कला आणि संस्कृतीचा’ हा विशेष सोहळा उद्या (२४ सप्टेंबर) सायंकाळी ६.३० वाजता चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आला आहे.
पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या ८ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याला राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत, महसूल राज्यमंत्री योगेश कदम आणि जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तसेच खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे, विधानपरिषद सदस्य निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, प्रमोद जठार, अनिकेत तटकरे, विधानसभा सदस्य भास्कर जाधव, शेखर निकम, किरण सामंत यांच्यासह चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आदी मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या या विशेष सोहळ्याचा नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांनी केले आहे.


