मुख्य बातमीशैक्षणिक

दिवेआगरच्या सर्वेश पारकर झाला सातासमुद्रापार बँकिंग आणि फायनान्स मास्टर्स

माजी सैनिकाच्या मुलाचे सर्वत्र कौतुक

अलिबाग (राजेश बाष्टे) : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील सुपुत्र सर्वेश श्रुती सुनील पारकर याने जिद्द व ध्येयाने इंग्लंड येथील बांगोर युनिव्हर्सिटीमध्ये विद्यापिठातून डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण होत पदव्युत्तर बँकिंग आणि फायनान्स विषयात मास्टर्स पदवी संपादन केली आहे. इंग्लंडमधील विद्यापीठात एका शानदार पदवी प्रदान (कन्व्होकेशन) समारंभात नुकतेच सर्वेश पारकर याला सन्मानित करण्यात आले आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील सर्वेश अभ्यासात अत्यंत हुशार, मनमिळाऊ पण तितकाच खोडकर होता, शिवाय लहानपणापासून आर्मी स्कूल ते पुढे KSV दहावीपर्यंत शिक्षण व त्यानंतर नॉवेल इन्स्टिट्यूट अकरावी व बारावी सायन्स आणि त्यानंतर पुण्यातील गरवारे उच्चभ्रू विद्यापीठातून BBA बॅचलर डिग्री घेतली. पुढे त्याने परदेशातून मास्टर्स डिग्री करण्याचे ठरवले व त्यासाठी काही ऑनलाईन exam त्याने दिल्या. त्यात त्याला उत्तम मार्क्स आणि साडे चार लाखांची शिष्यवृत्ती मिळवली. तसेच शैक्षणिक कर्ज घेत वर्षभर अभ्यास करून त्याने आपले निर्णय पालकांना सांगितले. काहीवेळा साठी त्यांनी हे शक्य होईल का ही शंका घेतली पण मुलाचा आत्मविश्वास आणि निर्धार बघून त्यांनी त्याला पूर्णपणे सहाय्य केले.

सर्वेश पारकर याचे वडील सुनील पारकर हे निवृत्त सैनिक असून आई श्रुती पारकर या अभिनेत्री आहेत. पुढील उच्च शिक्षण साता-समुद्रापार इंग्लड येथील बांगोर युनिव्हर्सिटीमधून डिस्टिंक्शन मिळवून मास्टर्स इन बँकिंग अँड फायनान्स पदव्युत्तर पदवी संपादीत करत उज्ज्वल यश प्राप्त केले आहे.

सर्वेशमध्ये जन्मजात उत्तम संघटन कौशल्य त्याचे ठायी असल्याने त्याचा मित्र परिवारही खुप मोठा आहे. अनेक सामाजिक कार्यातही तो हिरहिरिने सहभागी होतो. भारतात असताना त्याला रक्तदान केलेच पण तिकडे प्रदेशातही तो रक्तदान करतोय. आर्थिक उद्योगातील उत्पादने आणि सेवांसाठी नाविन्यपूर्ण असे तंत्रज्ञान संपादन केल्याने सर्वेशला पुढील आयुष्यातील वाटचालीत नक्कीच उपयुक्त ठरेल. सर्वेशचे संपूर्ण श्रीवर्धनकरांकडून विशेष कौतुक होत असून समाजाचे सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!