कुसुमताई सहकारी पतसंस्थेत ३ कोटींच्या ठेवी जमा

रत्नागिरी : शहरातील प्रतितयश कुसुमताई सहकारी पतसंस्थेचा ठेव वृद्धीमास १ जुलैपासून सुरू झाला असून २५ दिवसांमध्ये ३ कोटी रुपयांच्या ठेवी जमा झालेल्या आहेत. ग्राहकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून ठेवींसाठीची मुदत १ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.
पतसंस्थेने ठेवीदारांसाठी आकर्षक व्याजदर व ठेव योजना जाहीर केली आहे. सर्व ठेवीदारांसाठी सर्वाधिक ९ टक्के व्याजदर असून सहा महिन्यासाठी ६ टक्के व्याजदर, ३ वर्ष मासिक गुंतवणुकीवर (त्रैमासिक व्याज / वार्षिक व्याज) व्याजादर ८ टक्के, तसेच ३ वर्ष पुनर्गुतवणुकीवर ७.७५ टक्के व्याज ठेवीदारांसाठी ठेवण्यात आले आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही योजना १ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असून त्याचा लाभ घेऊन सभासदांसह नवीन ग्राहकांनी मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक करावी, असे आवाहन अध्यक्ष प्रा. दत्तात्रय उर्फ नाना शिंदे आणि उपाध्यक्ष सतीश शेवडे यांनी केले आहे.
कुसुमताई पतसंस्थेने अल्पावधीतच ग्राहकांमध्ये नाव मिळवले आहे. ग्राहकांसाठी चांगल्या सुविधा पंतसंस्थेकडून देण्यात आलेल्या आहेत. १ जुलैपासून पंतसंस्थेचा ठेववृध्दी मास सुरू होत आहे. कुसुमताई सहकारी पतसंस्थेने जुलै ते ऑगस्ट २०२५ असा ठेव वृढी मास जाहीर केला असून पतसंस्थेने यापूर्वी जाहीर केलेल्या ठेववृद्धी मासाला ठेवीदारांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. या विश्वासावर या वर्ष अखेरीस ५० कोटींचा टप्पा पार करण्याचे उद्दिष्ट संचालक मंडळाने निश्चित केले आहे. यंदा जाहीर केलेल्या योजनेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून २५ दिवसांत ३ कोटींच्या ठेवी जमा झाल्या आहेत. सध्या सोनेतारण कर्जाबरोबर जमीनतारण कर्जाला मागणी वाढत आहे. विजबिल भरणा केंद्र सर्व शाखांमध्ये सुरू असून त्याचाही फायदा ग्राहकांना व नागरिकांना मिळत आहे. आपल्या ठेवी पतसंस्थेमध्ये गुंतवून आकर्षक व्याजदराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष शेवडे यांनी केले आहे.
ही योजना पतसंस्थेच्या एकूण सहा शाखांमध्ये सुरू आहे. त्यात रत्नागिरी शहरातील गाडीतळ येथील मुख्य कार्यालय, जाकादेवी बाजारपेठ, खंडाळा बाजारपेठ, खेडशी गयाळवाडी फाटा, पावस बाजारपेठ आणि शुंगारतळी बसस्टॅण्ड येथे संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.



