मुख्य बातमीशैक्षणिक

जि. प. शाळा पूर्णगड नं. १ शाळेत रक्षाबंधन व एक राखी वृक्षासाठी उपक्रम उत्साहात संपन्न

रत्नागिरी : तालुक्यातील जि. प. शाळा पूर्णगड नं. १ शाळेत कार्यानुभव उपक्रमांतर्गत तयार केलेल्या पर्यावरणपूरक राख्या उत्पादक उपक्रम घेण्यात आला. तसेच शाळेत विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे रक्षाबंधन करण्यात आले.

या शाळेमार्फत नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही  इको- क्लब फॉर मिशन लाईफ या क्लबमार्फत एक राखीव वृक्षासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. वृक्षाचे पूजन करून त्याला राखी बांधण्यात आली. झाडे लावा, झाडे जगवा, त्यांचे रक्षण करा! हा संदेश रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने देण्यात आला.

शाळेचा हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षक पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर यांनी विशेष प्रयत्न केले. शाळेच्या उपक्रमाविषयी केंद्रप्रमुख संजय राणे, शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!