मुख्य बातमी

संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांची रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य संस्थाना भेट

रत्नागिरी : केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांसाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत “स्वस्थ  नारी, सशक्त परिवार” विशेष अभियान राबविले जात आहे. या शिबिरामार्फत महिलांसाठी आरोग्य तपासणी, उपचार, समुपदेशन सेवा मोफत पुरविल्या जात आहेत.

 

आज (२४ सप्टेंबर) सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर  तसेच आरोग्य सेवा कोल्हापूर परिमंडळ उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कोतवडे (ता. रत्नागिरी) येथे भेट दिली. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. मुक्तेश्वरी पाखरे, डॉ. मंदार कुलकर्णी यांच्याकडून प्राथमिक आरोग्य केंद्रात दिल्या जाणाऱ्या सेवांची व कामकाजाची सविस्तर  माहिती घेतली व सूचनावजा मार्गदर्शन केले. तेथील स्वच्छ्तेबद्दल समाधान व्यक्त केले.

त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र खानू (ता. रत्नागिरी) येथे आयोजित “स्वस्थ नारी, सशक्त परिवार”अभियान शिबिराला भेटीदरम्यान त्यांनी शिबिरामार्फत जनतेस देण्यात येत असलेल्या आरोग्य सेवांची माहिती घेऊन मार्गदर्शन केले. याप्रसंगी  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. विवेकानंद बिराजदार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव व खानु प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपशिखा, डॉ. ऋचा कुंभारे व कर्मचारी उपस्थित होते.

सर्व नागरिकांनी आपल्या घरातील सर्व महिला व मातांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे व आरोग्य विभागामार्फत देण्यात येत असलेल्या सर्व सेवा व योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!