मुख्य बातमी

आईनेच केली बाळाची हत्या; रत्नागिरीत घडलेल्या प्रकाराने सारेच सुन्न

रत्नागिरी : मूळ चिपळूण येथील रहिवासी असलेल्या महिलेने रत्नागिरीतील पारस नगर येथे आपल्याच १ वर्षाच्या पोटच्या गोळ्याला संपवल्याची हृदयद्रावक घटना २४ सप्टेंबर रोजी घडली. या घटनेमुळे सारेच सुन्न झाले आहेत. शाहीन आसिफ नाईक (३५, चिपळूण अलोरे) असे आईचे नाव असून, हुरेन असिफ नाईक (वय १ वर्ष, रा. अलोरे, चिपळूण) असे मृत बाळाचे नाव आहे.

शाहीन हिने बाळाच्या तोंडात कापूस कोंबून त्याची हत्या केल्याचे बोलले जात आहे. ही दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच, ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस्वी पाटील यांनी तातडीने आपल्या सहकाऱ्यांसह धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृत बालकाचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

दरम्यान या महिलेचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे समजते; मात्र, हत्येमागील नेमके कारण काय आहे आणि महिला मानसिक रुग्ण आहे किंवा कसे, याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!