मुख्य बातमीशैक्षणिक

पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर; संजय जाधव रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम

राहुल आग्रे, सोनाली मांगलेकर द्वितीय क्रमांक, तर धनाजी वाघमोडे, राजेश कांबळे तृतीय क्रमांक

रत्नागिरी : जिल्ह्यातील रत्नभूमी जर्नालिजम इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. मे/जून २०२५ मध्ये पार पडलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, या परीक्षेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून एकूण १५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विशेष बाब म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांनी यश मिळवले असून निकाल १०० टक्के लागला आहे.

या परीक्षेत एकूण १५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये संजय कृष्णा जाधव यांनी ८४.५० टक्के गुणांसह जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. राहुल दिलीप आग्रे आणि सौ. सोनाली तुषार मांगलेकर यांनी ८०.७५ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. धनाजी अप्पाजी वाघमोडे आणि राजेश रामचंद्र कांबळे हे दोघे ७९ टक्के गुणांसह तृतीय आले आहेत. इतर विद्यार्थ्यांमध्येही घवघवीत यश मिळाले असून ग्रहेश प्रकाश बिर्जे (७७.७० टक्के), अभिजित सर्जेराव जांभळे (७६.७५ टक्के), आणि आदित्य रमाकांत बाकाळकर (७५ टक्के) यांनी प्रथम श्रेणी मिळवली आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे रत्नभूमी जर्नालिजम इन्स्टिट्यूटच्या केंद्र प्रमुख श्रीमती धनश्री धनंजय पालांडे आणि केंद्र संयोजक अंकुश कदम यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पत्रकारिता हे केवळ व्यवसाय नव्हे, तर समाजाशी नाते जपणारे, सामाजिक भान जागवणारे एक सशक्त माध्यम आहे. घटनांच्या मागची सत्यता शोधून ती समाजापर्यंत पोहोचवणे हे पत्रकाराचे प्रमुख कर्तव्य असते. बदलत्या काळात डिजिटल माध्यमांच्या उदयानंतर पत्रकारितेची व्याप्ती वाढली असून, या क्षेत्रात आता केवळ वर्तमानपत्रापुरते मर्यादित न राहता वेब पोर्टल्स, मोबाईल पत्रकारिता, सोशल मिडिया इत्यादींचाही समावेश झाला आहे.

पत्रकार म्हणून काम करताना समाजाशी थेट संबंध येतो, लोकांच्या भावना समजतात, आणि अनेकदा त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे समाधानही मिळते. सतत नव्या घटना, नवीन माणसे, आणि विविध क्षेत्रांशी संवाद साधण्याची संधी मिळत असल्याने हे क्षेत्र अत्यंत गतिमान आणि प्रेरणादायी आहे. त्यामुळेच अनेक युवक पत्रकारितेकडे केवळ करिअर म्हणून नाही, तर सामाजिक भान जपणारा एक सकारात्मक मार्ग म्हणून पाहू लागले आहेत.

पत्रकारितेच्या माध्यमातून सत्य मांडण्याची ताकद मिळते आणि हेच या क्षेत्राचे खरे यश मानले जाते. रत्नागिरीतील या विद्यार्थ्यांनी दाखवलेली गुणवत्ता हेच सिद्ध करते की ग्रामीण भागातही पत्रकारितेचा उज्ज्वल भविष्यकाळ घडू शकतो. तुम्हाला पत्रकारिता क्षेत्रात काम करण्याची आवड असेल, तर रत्नागिरीमधील रत्नभूमी जर्नालिझम इन्स्टिटयूट हे एक उत्तम व्यासपीठ ठरू शकते.

या संस्थेमध्ये सध्या पत्रकारिता पदविका (Diploma in Journalism) या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू आहेत. हा अभ्यासक्रम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मान्यताप्राप्त असून, माध्यम क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी योग्य मार्गदर्शन, प्रात्यक्षिक अनुभव आणि व्यावसायिक कौशल्य देणारा आहे.

या कोर्ससाठी पात्रता म्हणजे बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील, तसेच माध्यम क्षेत्रात नव्याने प्रवेश करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स एक चांगली संधी आहे.

अधिक माहिती व प्रवेशासाठी संपर्क : 7030010004, 9763047787

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!