मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

हर्णै येथे जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट; स्थानिकांशी साधला संवाद

दापोली : तालुक्यातील हर्णै गावात घडलेल्या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून सद्यस्थितीची माहिती जाणून घेतली. तसेच नागरिकांना प्रशासनामार्फत आवश्यक ती सर्व मदत व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून संबंधित घटनेबाबत आवश्यक ती कार्यवाही सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता व संयम राखून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!