मुख्य बातमी

शहराच्या विकासाच्या दृष्टीने महायुतीचे नगरसेवक काम करतील : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : स्थानिक विकासासाठी नगरपालिकेची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी तसेच शहराच्या विकासाच्या दृष्टीने महायुतीचे नगरसेवक काम करतील. राज्य सरकारच्या विविध योजना व विकास कामे प्रभावीपणे राबविण्यासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ७ येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.

यावेळी शिवसेना उपनेते यशवंत जाधव, जिल्हा प्रमुख राहुल पंडित, तालुकाप्रमुख बंड्या शेठ साळवी, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुदेश मयेकर, नगरसेवक पदाचे उमेदवार श्रद्धा संजय हळदणकर, गणेश कमलाकर भारती, विभागप्रमुख संजय हळदणकर, उपशहरप्रमुख भाऊ देसाई, अमित भाटकर, परशुराम खानविलकर, समीर कदम, समीक्षा वालम, संपदा डोंगरे तसेच महायुतीचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!