मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हाशैक्षणिक

खोडदे गोणबरेवाडी येथे निवासी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन 

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील लोकशिक्षण मंडळ आबलोली संचलित आ. रा. स. अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर निवासी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि प्रशिक्षण अकॅडमी केंद्राचा उद्घाटन सोहळा गुरुपौर्णिमाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.

यावेळी लोकशिक्षण मंडळ आबलोली शैक्षणिक संकुल खोडदे गोणबरेवाडी येथील सभागृहात महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन दीपप्रज्वलित करून प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा लोकशिक्षण मंडळ आबलोली या संस्थेच्या वतीने जाहीर सत्कार आणि स्वागत समारंभ लोकशिक्षण मंडळ आबलोली या संस्थेचे कार्याध्यक्ष सचिन बाईत यांच्या अध्यक्षतेखाली झाला.

त्यानंतर लोकशिक्षण मंडळ आबलोली संचलित निवासी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि प्रशिक्षण केंद्राचा उद्घाटन सोहळा लोकशिक्षण मंडळ आबलोलीचे कार्याध्यक्ष सचिन बाईत, माजी डीवायएसपी विलास भोसले, आ.रा.स. अकॅडमीचे संस्थापक, संचालक ॲड. राकेश सत्वे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. त्यानंतर रेल्वे पोलिस एस. एस. कोरे आणि प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी मैदानावर गोळा फेक प्रात्यक्षिक दाखविले.

त्यानंतर लोकशिक्षण मंडळ आबलोली शैक्षणिक संकुल सभागृहात अकॅडमीच्या विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक डी. डी. गिरी, खोडदेचे सरपंच पूजा गुरव, आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी नेटके, रेल्वे पोलिस एस. एस. कोरे, डायटचे माजी प्राचार्य नेताजी कुंभार, माजी डीवायएसपी विलास भोसले, आ. रा. स. अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर रत्नागिरीचे संस्थापक आणि संचालक, ॲड. राकेश सत्वे, लोकशिक्षण मंडळ आबलोली या संस्थेचे कार्याध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन बाईत यांनी मार्गदर्शन करून गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी पोलिस पाटील सौ. श्रद्धा गोणबरे, सौ. योगिता पवार, सामाजिक कार्यकर्ते विलास गुरव, लोकशिक्षण मंडळ आबलोलीचे सीईओ अविनाश कदम, संचालक अनंत पागडे, सूर्यकांत बाईत, सौ. नेत्रा रहाटे, सौ. सुषमा उकार्डे, दिनेश नेटके, राकेश साळवी, अजित रेपाळ, ग्रामपंचायत सदस्य ऋषीकेश बाईत, रवींद्र निवाते आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय राजमाने यांनी केले. संदीप महाडिक यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!